८२.पश्चात्ताप करू नका : Don’t Regret
काम से बडी ताकत नही! लोगो के प्यार से बडी शोहरत नही ! और परिवार से बड़ी दौलत नही! असे म्हणतात prevention is better than cure, नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी. किंवा बैल गेला आणि झोपा केला. असे सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत घडत असते, ते म्हणतात यार ही गोष्ट मला येत होती, हे मी करू शकलो असतो हे माझे करायचेच राहूनच गेले. याचे कारण मी इतरांचे ऐकले आणि लोक काय म्हणतील या विचाराने मी ते केले नाही. आता मला त्याचा पश्चात्ताप होत आहे.
माणूस मृत्यूशय्येवर पडल्यावर खरे बोलतो. ऑस्ट्रेलियातील ब्रावूनी वेअर या नर्सने मृत्युशय्येवर पोहोचलेल्या लोकांची सेवा करताना त्यांना विचारले की तुम्हाला कशाचा पश्चात्ताप होत आहे? अशा अनेक लोकांना विचारून आलेल्या अनुभवातून तिने एक पुस्तक लिहिले त्याचे नाव आहे The top 5 Regrets of the dying. मृत्यू पूर्वीचे सर्वात मोठे पाच पश्चात्ताप. हे पुस्तक बेस्ट सेलर आहे ते खूपच गाजले आणि त्यामधील महत्त्वाचे पाच पश्चात्ताप असे.
१) मी इतरांच्या सांगण्यावरून जे काम केले त्यामधून मला जे यश मिळाले त्यापेक्षा मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम केले असते तर यापेक्षा कितीतरी पटीत जास्त मी यशस्वी झालो असतो. पण आता वेळ निघून गेली आहे. याचा मला पश्चात्ताप होत आहे.
२) भी जन्मभर ढोर मेहनत केली, त्यामुळे मी माझ्या जवळच्या आणि प्रेमाच्या स्नेहीजनांना वेळ देऊ शकलो नाही. याचा आता मला पश्चात्ताप होत आहे.
३) लोक काय म्हणतील या भीतीने मी माझ्या भावना बोलून दाखविल्या नाहीत. माझ्या भावना बोलून मन मोकळे करायला हवे होते. याचा आता मला पश्चात्ताप होत आहे.
४) मी माझ्या मित्रांच्या सहवासात राहून आनंद वाटायला हवा होता. ते राहूनच गेले. याचा मला पश्चात्ताप होत आहे.
५) मी जर माझ्या अंतर्मनाचे ऐकून त्याप्रमाणे जगलो असतो तर आजच्या पेक्षा जास्ती आनंदी व यशस्वी जीवन जगू शकलो असतो. आता मला त्याचा पश्यात्ताप होत आहे.
यशस्वी लोक हे आपल्या आवडीचं काम करून लोक काय म्हणतील याचा विचार न करता यशस्वी व आनंदी जीवन जगतात. तुम्ही पश्चात्ताप करण्यापेक्षा आत्ताच यशस्वी व आनंदी जीवन जगा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
