८८.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या यशाची चतुःसूत्री

८८.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या यशाची चतुःसूत्री

काय म्हणून जन्म घ्यावा आणि कुठे जन्म घ्यावा हे जरी आपल्या हातात नसले तरी, यशस्वी जीवन कसे जगावे, हे मात्र आपल्याच हातात असते. मनुष्य जन्म सर्वात श्रेष्ठ आहे. परमेश्वराने सर्वात जास्त तीक्ष्णबुद्धी आणि एकमेव वाचा फक्त मनुष्यप्राण्यालाच दिलेली आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपले रिटर्न तिकीट कन्फर्म असते. फक्त वेळ आणि ठिकाण आपल्याला माहीत नसते. म्हणूनच यशस्वी जीवन जगून, जन्माचे सार्थक करावे. जुनी म्हण आहे, मरावे परी कीर्तिरुपी उरावे, परंतु आता एकविसाव्या शतकात असे म्हणतात जगावे परी कीर्तिरूपी जगावे. तुम्ही किती वर्षे जगलात, त्यापेक्षा कसे जगलात, हेच महत्त्वाचे असते. म्हणून यशस्वी जीवन जगा.

माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम म्हणत असत, मनुष्य आपले भाग्य बदलू शकत नाही. पण चांगल्या सवयीमुळे आपण आपले भविष्य निश्चित बदलू शकतो. आज आपण जे काही आहोत ते यापूर्वीच्या सवयीमुळेच. आणि भविष्यात आपण जे काही बनणार आहोत तेही आपल्या सवयीमुळेच. म्हणून चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयी या मुद्दाम होऊन लावाव्यां लागतात. तसेच चांगली संगत ठेवा आणि यशस्वी जीवन जगा. एपीजे अब्दुल कलाम यांनी यशस्वी जीवनाची चतुःसूत्री सांगितली आहे. ती अशी-

१. Great Aim  मोठे ध्येय

असे म्हणतात Not failure but low aim is a crime. फेल होणे हा काही गुन्हा नसतो पण छोटे उद्दिष्ट छोटे ध्येय ठेवणे हा मात्र गुन्हा ठरू शकतो. ज्या क्षेत्रातून आपणास यशस्वी व्हायचे असेल, त्याच क्षेत्रातील मोठे ध्येय ठेवल्यास, तीच आपल्या जीवनाची दिशा ठरू शकते. त्यासाठी Who I am? मी कोण आहे? माझा जन्म हा फक्त जगण्यासाठी नसून जिंकण्यासाठीच झाला आहे. आणि मला मरण्यापूर्वी काय मिळवायचंय! त्यासाठीच मोठे ध्येय ठरवा. त्याशिवाय कृती करता येत नाही. म्हणून मोठे ध्येय ठेवा आणि यशस्वी जीवन जगा.

२) Constant acquire knowledge! सतत ज्ञान घेत चला : 

अब्दुल कलाम सर म्हणतात, यशस्वी व्यक्ती जन्मभर स्वतःला विद्यार्थी समजून, सततचे ज्ञान घेत असतो. कारण ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे. असे ज्ञान हे वाचून, ऐकून, चर्चा करून, मनन चिंतन करून मिळवायचे असते. जगात जेवढे लोक यशस्वी झाले ते त्यांच्या यशाचे श्रेय ज्ञान आणि कष्टालाच देतात. म्हणून सतत वाचत चला. वाचाल तरच वाचाल आणि

३) समृद्धही व्हाल. Hard Work कठोर परिश्रम :

असे म्हणतात जीवन का इम्तिहान आसान नही होता ! और बिना संघर्ष से कोई महान नही होता! जब तक न पडे हातोडी की मार ! तब तक पत्थर भी भगवान नही होता! आम्ही शाळेत असताना भिंतीवर लिहिलेले असायचे आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ, या म्हणी प्रमाणे कठोर परिश्रम करावेच लागतील. आपल्या हार्ड वर्क ला स्मार्टवर्कची जोड दिल्यास, लवकर आणि निश्चित यश मिळते. हा माझा स्व अनुभव आहे. म्हणूनच कठोर परिश्रम करा आणि यशस्वी जीवन जगा.

४) Preserve and succeed चिकाटीनेच यश मिळते

मित्रांनो असे म्हणतात Rom was not built in a day. किंवा पी हळद आणि हो गोरी असे कधीच होत नसते. त्यासाठी लागते सातत्य, यशस्वी जीवनातील यशासाठी लागतो तो संयम आणि चिकाटी. धीरज का फल मीठा होता है! कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीला इनपुट जास्त द्यावे लागते आणि आउटपुट कमीच मिळते. परंतु संयमाने आणि चिकाटीने, धीर धरून कार्य केल्यास पुढे निश्चित यश मिळते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!