९०.झोपेतही पैसे कमावणे शिका
तुम्ही झोपेतही पैसे कमावणे शिकला नाहीत तर तुम्हाला जन्मभर कामच करावे लागेल. आजच्या काळात उत्पन्नाचे असे मार्ग चालू करा, जे तुम्हाला व तुमच्या पुढील पिढीलाही कायमचे उत्पन्न देत राहतील. उदाहरणार्थ १) आंब्याचे, नारळाचे चिंचेचे झाड लावा; काही दिवस
सांभाळा. त्यानंतर ते कायमचे उत्पन्न देत राहतील. २) तुम्ही कमावलेले पैसे अशा ठिकाणी गुंतवा की त्यामधून कायमचे उत्पन्न मिळत राहील. शेअर्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्सचे अॅन्युटी इन्कम, रिअल इस्टेटमधील रेंटल इन्कम किवा नेटवर्क मार्केटिंगमधील उत्पन्न ३) लोकांना लागणारे व तुम्हाला येणारे असे फूड रेसिपीज, योगा, ऑनलाईन क्लासेस आदींचे व्हिडिओ बनवा व ते एकदाच सोशल मीडियावर अपलोड करा. त्यानंतर निरंतर पैसे कमवा. तसेच झोमॅटो, स्विगी, ओला, उबर यांच्यासारखे सेवा देणारे अॅप बनवा व झोपेतही पैसे कमवा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
