१०५.एक रुपयाची किंमत जाणा

१०५.एक रुपयाची किंमत जाणा

उद्योग किंवा व्यवसायात एक एक रुपया अत्यंत महत्त्वाचा असतो. पैशाला पैसा जोडून तोच कमावलेला, वाचविलेला पैसा व्यवसायात गुंतवून व्यवसाय वाढवायचा असतो. तुम्ही म्हणाल आजच्या काळात एक रुपयाला काय किंमत आहे? म्हणूनच सांगतो, जर तुम्ही तुमच्या पार्टीला ५०० रुपयांचा चेक दिला व तुमच्या खात्यात ४९९ रुपये शिल्लक असतील तर तो चेक एका रुपयासाठी बाउन्स होऊन रिटर्न चार्जेस म्हणून बँक ५०० रुपयांचा दंड वसूल
करते. त्यामुळे मार्केटमधील आपल्या विश्वासाला व इज्जतीला तडा जातो. बँकेचा सिबिल स्कोअर खराब होऊन कर्ज मिळण्यात अडचणी येतात. एक रुपयाला कमी समजू नका. एक रुपयाच्या बेरजेने किंवा वजाबाकीने प्रचंड उलाढाल होते. म्हणून, उद्योग-व्यवसायात एक रुपयाची किंमत जाणा व यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!