१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

१) दररोजची ध्येय निश्चिती करणे :-

सात शिस्तीमधील ही पहिली शिस्त आहे. आपले आयुष्याचे एक मोठे ध्येय ठरवा. त्याला पुरक अशी दर पाच वर्षांची, दर वर्षाची ध्येय ठरवा. आणि ती वार्षिक ध्येय प्राप्त करण्यासाठी दररोजची ध्येय ठरवा. प्रत्येक दिवस कामाला लागला तर प्रत्येक आठवडा कामी येईल आणि प्रत्येक आठवडा कामी आला तरच प्रत्येक महिना कामी येईल. आणि जर प्रत्येक महिना कामी आला तरच वर्ष कामी येईल. आणि असे जर सगळे सुरळीत पार पडले तरच आपले आयुष्याचे मोठे ध्येय प्राप्त करता येईल. त्यासाठी गरज आहे ती एकही दिवस वाया न जाईल याची दक्षता घेण्याची. दिवस वाया जाणे म्हणजेच तुम्ही
तुमच्या ध्येयापासून एक पाऊल लांब जाणे किंवा माजरक एक पाऊल लांब पडले तर मग ध्येय प्रामी ती कशातून होणार? जेव्हा तुम्ही दिवसाची काळजी घ्या. आठवडा, महिना आणि वर्ष आपोआप कमीল,

तेव्हा आपल्या आयुष्यातील एकही दिवस वाया जाऊ नये याची हता घेण्यासाठीच आपण दररोजचे ध्येय निश्चित केलं पाहिजे शांत बाते १० मिनिटे चिंतन करा आणि आज मी कोणती दहा काम करायची त्याची एक यादी बनवा. यासाठी आपणाकडे दररोज भेटेरत अशी एक डायरी, नोटांड आणि एक पेन कायम सोबत ठेवा. लक्षात ठेवा जे लक्षात राहणार नाही ते तुम्हाला लक्ष्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा आपल्या लक्षात आपली सर्व कामे रहावीत आणि ती सर्वच्या सर्व त्याचदिवशी पूर्ण व्हावीत असे वाटत असेल तर ती ध्येय लिहून काढायची, नोंद करायची स्वतःला शिस्त लावा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!