अपयश ही यशाची पहिली पायरी नाही !

अपयश ही यशाची पहिली पायरी नाही !

चांगली सुरुवात हे अर्चे यशव Well Begun is Half Done

चांगली सुरुवात हे अर्धे यश असते. क्रिकेटमध्ये फलंदाज जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा काही फलंदाज पहिल्या दहा-बारा बॉलमध्येच बाद होतात. तर काही खेळाडू खेळपट्टीचा, गोलंदाजाचा अंदाज घेण्यासाठी सुरुवातीचे काही चेंडू सावधपणे खेळतात. एकदा नजर बसल्यावर, खेळपट्टीचा, गोलंदाजाचा अंदाज आल्यावर तो आपले हुकमी फटके मारायला सुरुवात करतो. त्यानंतर मग त्याला रोखणे गोलंदाजासाठी कठीण होऊन बसते. चांगल्या सुरुवातीवरच पुढची शतकी वाटचाल अवलंबून असते. यशस्वी होण्यास्तठीही सुरुवातीला सावधपणे पावले टाकणे आवश्यक असते.

अब्राहम लिंकन यांचे अनुभवाचे बोल…

अब्राहम लिंकन यांचा जन्म एका सर्वसामान्य लाकूडतोड्याच्या घरात झाला. पुढे लिकन हे जगातील सर्वात श्रेष्ठ अशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. आपल्याला वाटेल, किती नशीबवान होते लिंकन! पण त्यांचे चरित्र वाचले, तर तुम्हाला कळेल हा नशिबाचा भाग आहे की, त्यांच्या दृढनिश्चयाचा. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत लिंकन यांनी अनेक व्यवसाय केले, जगण्यासाठी प्रचंड धडपड केली. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी अपयशव पडले. नंतर त्यांना वाटले की, आपण राजकारणात उतरावे. म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. पण तिये अपयश आले. पुढे मग त्यांनी जिल्हा परिषद, आमदारकीसाठी प्रयत्न केले. तिचेही अपयशाचाच सामना करावा लागला. नंतर मग त्यांनी अमेरिकन सिनेटसाठी खासदारकीसाठी प्रयत्न केला. याही निवडणुकीत पराभवच पत्करावा लागला. ही पराभवाची मालिका सुरू असली, तरी त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. वयाच्या चोपत्राव्या वर्षी त्यांनी वेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली. आणि मागचे सगळे अपयश धुवून काढत त्यांनी या निवडणुकीत विजयश्री मिळवीत इतिहास रचला. लोकांना फक्त राष्ट्राध्यक्ष झालेले लिकन दिसतात, त्या आधीचे वारंवार अपयशी झालेले तरीही जिद्द न सोडता प्रयत्न करीत राहिलेले लिंकन दिसत नाहीत. म्हणूनच लिंकन यांना फक्त नशीबवान म्हणता येणार नाही, तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नवादी राहणे हेच समजून घ्यावे.

विंबल्डन विजेता ऑर्थर अॅशचा प्रश्न… ‘मी’च का?

ऑर्थर अॅश हा एक नावाजलेला टेनिस खेळाडू होता. विंबल्डन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी त्याने केली. त्याला दुर्दैवाने हृदयरोग झाला व त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैव येथेच थांबले नाही, शस्त्रक्रियेदरम्यान दिलेल्या रक्तामुळे त्याला एचआयव्हीची बाधा झाली. तो मृत्युशय्येवर पोहचला. १९८३ मध्ये तो मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. अनेक चाहते त्याला पत्र पाठवीत. एकाने लिहिले, ‘अशा वाईट रोगासाठी देवाने तुलाच का निवडले?’ त्या पत्राला अॅशने अतिशय सुंदर उत्तर पाठविले. तो लिहितो, ‘जगभरात दरवर्षी सुमारे ५ कोटी मुले टेनिस खेळायला सुरुवात करतात. त्यातील ५० लाख मुले बऱ्यापैकी टेनिस शिकतात, त्यातील फक्त ५ लाख मुलेच व्यावसायिक टेनिसपटू बनतात. त्यातही फक्त ५ हजार खेळाडू अँड स्लॅम स्पर्धेपर्यंत पोहचतात. त्यातील फक्त ५० जणच विंबल्डनचा टप्पा गाठतात. त्यातील फक्त चारच सेमीफायनलला पोहचतात. दोघांनाच अंतिम फेरीत खेळता येते व एकच विजेता होतो. अशा सर्व प्रक्रियेतून जात मी १९७५ साली विंबल्डन ट्रॉफी जिंकलो, तेव्हा मी देवाला ‘मी’च का असा प्रश्न विचारला नाही. मग आज या वाईट अवस्थेसाठी तरी मी देवाला का विचारू, ‘मी’च का? असा प्रश्न मी कधीच विचारणार नाही!’

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!