यशाचे गुपित
यशस्विता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी अहमदनगरच्याच इमारत कंपनी परिसरातील एका भाषणात घोषणा केली होती की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!’ आज आपण स्वतंत्र देशात राहतो. त्यामुळे आपण लोकमान्यांचीच ती ऐतिहासिक घोषणा बदलून असे म्हटले पाहिजे की, ‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच.’ मित्रांनो, यश हे जन्माने नव्हे तर कर्माने मिळत असते. शिवाजी महाराज हे शिवाजी शहाजी भोसले म्हणून जन्मले, पण जाताना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ बनून गेले. डॉ. आंबेडकर हे भीमराव रामजी आंबेडकर या नावाने जन्मले. पण जाताना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ म्हणून ओळख ठेवून गेले. गांधीजींचे मूळ
नाव मोहनदास करमचंद गांधी, पण संपूर्ण जग त्यांना ‘महात्मा गांधी’ या नावानेच ओळखते. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा दीनानाथ मंगेशकर, पण कर्तृत्वाने त्यांनी ‘भारतरत्न, गानसम्राज्ञी’ अशी विरुदावली मिळविली. यावरून कळते की, माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होता.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
